Pune news :अनेक ठिकाणी आपण बघतो की मुलं आपल्या आईवडीलांना संभाळत नाहीत. तसेच संपत्तीवरून त्यांच्याशी भांडत असतात. आता वडिलांची मालमत्ता आणि बँकेतील रोकड हडप करून पोटच्या मुलांनी वृद्ध वडिलांना रस्त्यावर आणल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुलाने मालमत्तेचे बक्षीसपत्र करून घेऊन सांभाळ करण्यास नकार दिल्याने सोमवार पेठ परिसरातील मोफत अन्नदान केंद्रावर जेवण्याची वेळ वृद्ध वडिलांवर आली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
पुणे शहरात हा प्रकार समोर आला आहे. येथील सोमवार पेठेतील गंगोत्री अपार्टमेंट येथे राहणाऱ्या ७७ वर्षीय व्यक्तीने याबाबत तक्रार दिली आहे. यानंतर पोलिसांनी तपास केला. त्यावरून त्यांचा मोठा मुलगा आणि मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराला दोन मुले आणि एक मुलगी आहे. तर, त्यांच्या पत्नीहयात नाहीत. तक्रारदार सोमवार पेठेत एकटेच राहत आहेत. ते मुंढव्यातील एका खासगी कंपनीतून सेवा निवृत्त झाले. त्यांची मुले पुण्यातच दुसऱ्या ठिकाणी राहतात.
दरम्यान, या वडिलांच्या नावावर राहत्या फ्लॅटसह पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे आणखी दोन फ्लॅट होते. पत्नीच्या नावावर देखील धनकवडी येथे प्लॅट होता. असे असताना मुलाने ‘मी तुमचा शेवटपर्यंत सांभाळ करतो, असे म्हणून मालमत्तेचे बक्षीसपत्र स्वत:च्या नावे करून घेतले.
असे असताना मात्र नंतर त्यांना हाकलून दिले. तसेच मुलाने राहत्या फ्लॅटची कागदपत्रेदेखील स्वत:च्या ताब्यात घेतली आहेत. यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास केला.