Pune News: माजी सरपंचाने आळंदीतील इंद्रायनी नदीत दिला जीव; धक्कादायक कारण आले समोर

Pune News: पुण्यातील आळंदी येथे मराठा आरक्षणावरून एका व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलले आहे. इंद्रायणी नदीतून उडी मारून एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. त्यांनी नैराश्यातून हे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे.

मराठा समाजाला आरक्षण तसेच मुलाला अनुकंपावर नोकरी मिळत नसल्याच्या कारणाने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. याबाबत माहिती अशी की, व्यंकट नर्सिंग ढापरे (६०) ते पुण्यातील नर्हे आंबेगाव येथील राहणारे होते.

त्यांनी आळंदी येथे आपले जीवन संपवले आहे. त्यांचा मृतदेह इंद्रायणी नदी पात्रात आढळला आहे. रात्रीपासूनच त्यांचा शोध सुरू केला होता. अखेर दुपारी दोनच्या सुमारास त्या वृद्ध व्यक्तीचा मृतदेह इंद्रायणी नदी पात्रात आढळला आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. तसेच माझ्या मुलाला सरकारी अनुकंपावर नोकरी मिळाले नाही. सरकारच्या चुकीच्या कार्य पद्धतीमुळे माझा मुलगा बेकार फिरत आहे.

तसेच मी स्वतः सरपंच असताना निराधारांसाठी अनुदान मिळावे, यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. मात्र यश मिळाले नाही. यामुळे न्याय मिळत नसल्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच हे सरकार केवळ स्वतःची खळगी भरण्यासाठी व्यस्त आहे. न्याय मिळत नसल्याने निराशेपोटी आत्महत्या करत असल्याचे ढापरे यांनी चिट्टीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांकडूनच पुढील तपास सुरू आहे. मात्र घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.