Pune news : चेष्टा आली अंगलट! पुण्यात मस्करीत एअर कॉम्प्रेसरने मित्राच्या गुद्द्वारात हवा मारली, मुलाचा मृत्यू…

Pune news : पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील हडपसरमध्ये फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये काम करणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या शरीरामध्ये गुद्द्वारामधून हवा भरली.

या मुलाच्या एअर कॉम्प्रेसरचा पाईप लावून या मुलाच्या अंगात हवा भरण्यात आली. यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. हडपसर येथील इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याबाबत शरीरामध्ये हवा भरल्याने मरण पावलेल्या मुलाचं नाव मोतीलाल साहू असे आहे. तसेच आरोपीचे नाव धीरजसिंग गोपालसिंग गौड असे आहे. फिर्यादी शंकरदिन आणि त्यांचा भाचा मोतीलाल, आरोपी धीरज सिंग हे तिघेही हडपसर इंडस्ट्रियल एरियामध्ये असलेल्या ‘पुना फ्लोअर अँड फूड्स’ कंपनीमध्ये काम करतात.

धीरजसिंग काम करत असताना त्यावेळी धीरजसिंग आणि मोतीलाल त्यांच्यात चेष्टा मस्करी सुरू होती. यामुळे हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणामध्ये पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

दरम्यान, याबाबत मस्करीत केलेल्या कृतीमुळे मित्राचा मृत्यू होईल याची कल्पना धीरजसिंगला नव्हती, असा त्याचा दावा आहे. या घटनेत त्याला सुध्दा मोठा धक्का बसला होता. कॉम्प्रेसरमधील हवेचा दाब खूपच जास्त होता.

ही हवा पोटात गेल्याने मोतीलालला अंतर्गत शारीरिक इजा झाली. याचा परिणाम एवढा गंभीर होता की मोतीलालचा तडफडून जागीच मृत्यू झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अगोदरच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.