Pune News : येरवडा येथील खुल्या जिल्हा कारागृहातून आशिष जाधव या कैद्याने पलायन केले होते. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यामुळे याची चर्चा सुरू होती. असे असताना पोलिस त्याचा शोध घेत होते. असे असताना कैदी पुन्हा एकदा याठिकाणी हजर झाला आहे.
पोलिसांनी कैद्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधला असता, त्याची आई हृदयविकाराने आजारी होती. त्यामुळे त्याने कारागृहातून पलायन केले असावे, असे म्हटले जात आहे. कारागृहातून पळून गेलेला कैदी आज स्वत:हून कारागृहात हजर झाला. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
याबाबत माहिती अशी की, कैदी आशिष भरत जाधव हा सोमवारी कारागृहातून पळून गेला होता. यामुळे प्रशासनावर टीका होत होती. यामुळे त्याचा शोध घेतला जात होता. यानंतर कैदी आशिष जाधवचे आई आणि वडील त्याला कारागृहात हजर करण्यासाठी आज घेऊन आले. यामुळे मोठी पळापळ झाली.
नंतर कारागृह प्रशासनाने ही बाब येरवडा पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी कैद्याला ताब्यात दिले. सध्या त्याच्याबाबत चौकशी केली जात आहे. येरवडा तुरुंगात कडक पहारा असतो. यातून हा कैदी पळून जाण्यात यशस्वी कसा झाला. याचा शोध पोलीस घेत असून आणि यावर नव्याने उपाय योजना आखात आहेत.
हा कैदी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीची हत्या झाली होती. या प्रकरणात अटकेत आहे. त्याला येरवडा कारागृह प्रशासनाने रेशन विभागात काम करण्यासाठी नियुक्त केलं होतं. या कामादरम्यानच तो पळून गेला होता, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.
सध्या याठिकाणी पोलीस सतर्क झाले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या घटनेमुळे मात्र खळबळ उडाली होती. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.