Pune news : पुण्यातील लोहगाव परिसरातील एका बंद घरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले आहेत. पतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नीचा बेडवर झोपलेल्या अवस्थेत मृतदेह आहे.
याबाबत पोलीस तपास सुरू आहे. ही घटना सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास येथील लोहगाव वडगाव शिंदे रोड लेक व्हिव सिटी या सोसायटीत उघडकीस आली आहे. घटनेनंतर पोलिसांना याबाबत लगेच माहिती देण्यात आली.
याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान हा प्रकार खूनाचा आहे की आत्महत्येचा, हे मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येईल. या घटनेमुळे मात्र मोठी खळबळ उडाली आहे.
किरण महादेव बोबडे (२३), आरती किरण बोबडे (२०, दोघे राहणार रा. वडगाव शिंदे रोड,लोहगाव ) अशी दोघांचे नावे आहेत. त्यांच्या घरातून वास येत असल्याचे घरमालक प्रशांत यादव यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच याबाबत पोलिसांना माहिती दिली.
याठिकाणी पोलीसही लगेच आले. खोलीचा दरवाजा बंद होता. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता किरणचा मृतदेह छताच्या हुकला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तसेच पत्नी आरती ही बेडवर मृत अवस्थेत मिळून आली.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तपासात अधिकची माहिती समोर येईल.