Pune news : भीषण! पुण्यात दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू, गाड्या अक्षरशः हवेत उडाल्या…

Pune news : पुण्यातून अपघाताची एक बातमी समोर आली आहे. येथील पुरंदर तालुक्यातील सासवडजवळ असणाऱ्या परिंचे-सासवड रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघातात दोन्ही वाहने काही अंतरावर उडून पडली आहेत. तसेच तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या अपघाताने रस्त्यावर काही वेळ गर्दी झाली होती. यामध्ये संजय जयसिंग नानगुडे (२६) आणि चंद्रकांत संपत दानवले (५०) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तसेच जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, घटनेनंतर सासवड पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू असून या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर कुटूंबाला एकच धक्का बसला.

मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सासवडचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अनिल खोमणे पुढील तपास करीत आहेत. या घटनेनंतर वाहतूक कोंडी झाली होती.

दानवले हे दुचाकी क्र. एम एच १२ जे पी ९४८९ या दुचाकीवरून परिंचे गावाकडून सटलवाडीकडे निघाले होते. तसेच संजय नानगुडे हे त्यांची दुचाकी क्र. एम एच १२ इ एक्स ०५३२ वरून येत होते. यावेळी हा अपघात झाला.

परींचे – सासवड रस्त्यावर समोरासमोर धडक झाली. ही दोन्ही वाहने वेगात असल्याची माहिती समोर आहे. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी मोठी गर्दी झाली होती.