Pune news : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वाघोली परिसरात एका प्रेमी युगलाने एका लॉजमध्ये एकाच ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे. या प्रेमीयुगलाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. सकाळी ते लॉजमध्ये आले होते. संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते खोली सोडून जाणार होते.
असे असताना मात्र, सहा वाजल्यानंतरही ते खाली आली नाहीत. यामुळे लॉजच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेकदा फोन करुनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे कर्मचारी त्यांच्या खोलीकडे गेले. तेव्हा ही घटना उघडकीस आली.
सचिन गोकुळ शिंदे (वय.२१ सध्या रा. खराडी, मुळ रा. नेहरु कॉलनी, भिंगार, अहमदनगर) आणि कोमल सुनील बर्के (वय.२० रा. चंदननगर, खराडी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी खोलीजवळ जाऊन बेल वाजवली.
परंतु खोलीमधून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खोलीचा दरवाजा ढकलला. कामगारांनी दरवाजा उघडला असता सचिन आणि कोमल यांनी एकाच ओढणीने गळफास घेतल्याचे आढळून आले. यामुळे त्यांना धक्काच बसला.
त्यानंतर त्यांनी लोणीकंद पोलिसांना घटनेची माहिती दिली. दोघांनी आत्महत्या का केली, यामागचे कारण समजू शकले नाही. घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोट सापडली नाही. याबाबत पोलिसांनी कुटूंबाला माहिती दिली आहे.
कोमल ही डी-एमएलटीचे शिक्षण घेत होती. तर सचिन पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरज राजगुरु करत आहेत.