पुण्यातील नामवंत डॉक्टराचे भयानक कृत्य झाले उघड, कित्येक वर्षांपासून करत होता…

पुण्यातील हडपसर भागातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रसिद्ध भूलतज्ज्ञ असलेले डॉ. अदनान अली सरकार हा इस्लामिट स्टेट म्हणजेच आयएसशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. एनआयएने त्याला ताब्यात घेतले आहे.

अदनान अली हा महाराष्ट्र मॉड्युलचा प्रमुख आहे. आयएसशी संबंधित देशभरात आतापर्यंत जितक्याही आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यांचा अदनानशी कसा संबंध आहे याबाबत एएनआय तपास करत आहे.

तरुणाची माथी भडकवून त्यांना आयएसमध्ये भरती करण्याचे काम महाराष्ट्र मॉड्युलद्वारे करण्यात येत होते. एनआयएने गुरुवारी त्याच्या कोंढव्यातील घरावर छापा टाकला होता. तिथेच त्याला अटक करण्यात आली आहे.

लॅपटॉप, हार्डडिस्क, सीमकार्ड, तसे आयएसशी संबंधित जी काही कागदपत्रे होती ती जप्त करण्यात आली आहे. हा डॉक्टर तरुणांची माती फिरवून त्यांना आयएसमध्ये भरती करण्याचे काम करत होता, अशी माहिती एनआयएला मिळाली होती.

प्राथमिक तपासात डॉ. अदनान आयएसशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ अदनान हे हडपसरमधील एक नामवंत भूलतज्ज्ञ आहे. गेल्या १५ वर्षांपासून ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असून पुण्यातीलच महाविद्यालयातून त्यांचे शिक्षण झाले होते.

एनआयएने याआधी महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणी मुंबई, ठाणे आणि पुण्यातून काही तरुणांना अटक केली होती. ताबिश नासीर सिद्धीकी, जुबेर नुर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाले अशी त्यांची नावे होती.

एनआयएने त्यांची चौकशी केली असता यामध्ये डॉ. अदनान अली सरकार हा सुद्धा सामील असल्याचे त्यांना कळाले. तरुणांची माथी भडकवून त्यांना दहशतवादाच्या कामात सामील करुन घेण्यासाठी तो काही वर्षांपासून काम करत आहे, अशी माहिती एनआयएला देण्यात आली होती. त्यानंतर एनआयएने अदनान अलीवर कारवाई केली आहे.