राधिका आपटे ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती तिच्या चित्रपटातील भूमिकांमुळे आणि तिच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत येत असते. आता ती तिच्या एका नव्या सिरिजच्या एका सीनमुळे चर्चेत आली आहे.
जोड्या स्वर्गात बनलेल्या असतात असे कितीही म्हटले तरी त्या टिकून राहण्यासाठी दोन व्यक्तींनाच प्रयत्न करावे लागतात. प्रेमाच्या, विवाहाच्या नात्यात अनेक गैरसमज, तेढ निर्माण होत असतात. त्यांच्यावर भाष्य करणारी मेड इन हेवन ही वेब सिरीज नुकतीच रिलिज झाली आहे.
मेड इन हेवनचा हा दुसरा सिजन आहे. पहिल्या सिजनला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे हा दुसरा सिजन काढण्यात आला आहे. ऍमेझॉन मिनीवर ही सिरिज रिलिज करण्यात आली आहे. या सिरीजमधील एक सीनचे चाहते खुप कौतूक करताना दिसून येत आहे.
या सीनमध्ये अभिनेत्री राधिका आपटेने असे काही केले आहे की तिचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. तसेच अभिनेत्री शोभिता धुलापालने साकारलेली ताराची भूमिका आणि अर्जून माधुरने साकारलेली करणची भुमिकाही लोकांना प्रचंड आवडली आहे.
सिरिजच्या पाचव्या भागात अभिनेत्री राधिका आपटेवर सर्वांचे लक्ष असते. द हार्ट स्किप अ बिट नावाच्या कथेसाठी राधिकाने पल्लवी मांडके नावाच्या एका तरुणीची भुमिका साकारलेली आहे. त्यामध्ये ती एक वकील आणि बौद्धधर्मिय असून, मागासवर्गीयांसाठी ती लढताना दिसून येत आहे.
पाचव्या भागामध्ये ती एका उच्चभ्रू हिंदू तरुणाशी लग्न करते. त्यावेळी ती हिंदू पद्धतीसोबतच बौद्ध पद्धतीनेही विवाह करायला त्याला सांगते. त्यानुसार त्यांचा विवाहही पार पडतो. हा भाग लोकांना फार आवडला असून लोक तिचे खुप कौतूक करताना दिसून येत आहे.
भगवान गौतम बुद्धांचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो समोर नवरा-नवरी नतमस्तक होणं हे पाहून सगळ्यांनी त्यांचं कौतूक केलं आहे. या सिरिजमधील हा आतापर्यंतचा सर्वात सुंदर भाग असल्याचेही काहींनी म्हटले आहे.