Rahul Narvekar : …तर आमदार अपात्रतेचा निर्णय मागे घेतला जाईल! राहुल नार्वेकरांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

Rahul Narvekar : महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल दिला. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. यामध्ये शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार अनपेक्षितपणे पात्र ठरले. यामुळे याची चर्चा रंगली.

नार्वेकरांनी कोणत्याही आमदारांना अपात्र केलं नाही. तसेच खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. आता उद्धव ठाकरे यांच्या गटाने नार्वेकरांच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

तसेच शिंदे गटानेही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ठाकरे गटातील आमदारांना पात्र ठरवण्याच्या निर्णयाविरोधात शिदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे आता यामध्ये काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी कोणालाही संतुष्ट करण्यासाठी हा निकाल दिलेला नाही. मी कायद्याला धरूनच हा निकाल दिला. कायद्याच्या अनुषंगाने आणि संविधानातील तरतुदींचं पालन करून, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायलयाच्या तत्वांच्या आधारावर हा निकाल दिला आहे.

या निर्णयामध्ये काही बेकायदेशीर घडलंय का? ते न्यायालयाला दाखवावं लागेल. तसं सिद्ध केलं तरच तो निर्णय रिव्हर्स होऊ शकेल, असेही नार्वेकरांनी म्हटले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. या निर्णयामुळे नार्वेकरांवर टीका केली जात आहे.

दरम्यान, तब्बल सात महिन्यांनी विधानसभा अध्यक्षांनी याप्रकरणी निकाल दिला. नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी मुंबईतील विधान भवनात या निकालाचे वाचन केले. या निकलामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.