Raigad Accident News: मुंबई- पुणे हायवेवर चालत्या रुग्णवाहिकेत स्फोट, महीला पेशंटसोबत घडलं भयंकर

Raigad Accident News: रायगडमध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली हद्दीत रुग्णवाहिकेत स्फोट झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये रुग्णवाहीकेचा जळून पूर्णत: कोळसा झाला आहे. रुग्णवाहिका एका महिला रुग्णाला घेऊन मुंबईहून पुण्याकडे निघाली होती.

यावेळी पुणे लेनवर असताना रुग्णवाहिका बंद पडली. त्यामुळे रुग्णवाहिकेतील रुग्ण महिलेसह अन्य व्यक्तींना खाली उतरवण्यात आले. चालकाने खाली उतरुण गाडी दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णावाहिका दुरुस्त झाली नाही.

याठिकाणी अचानक गाडी रिवर्स जाऊ लागली. थोड्या अंतरावर जाऊन या रुग्णवाहिकेचा भीषण स्फोट झाला. यामध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. झालेल्या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. मदत मिळेपर्यंत खूप उशीर झाला होता.

रुग्णवाहिकेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. मात्र तोपर्यंत रुग्णवाहिकेचा जळून कोळसा झाला होता. यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान, घटनेनंतर महिलेला दुसऱ्या नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ॲम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला असल्याची माहिती आहे.

या घटनेत सुदैवाने पोलीस कर्मचारी आणि बचाव दलातील सदस्य बचावले मात्र एका पोलीस कर्मचाऱ्यांचे वाहन जळून खाक झाली आहे. घटनेनंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. यावेळी मोठी गर्दी झाली होती.