Raigad News : सोन्‍यासारखी मुलं सोडून जाताना वेदना होतात, सरकारला आता तरी कळेल का? शिक्षकाची आत्महत्या…

Raigad News : रायगड जिल्ह्यातील पेण येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी आर्थिक विवंचनेतून शिक्षकाने विष पित आपले जीवन संपवले आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी राज्य व केंद्र सरकारला दोष दिला आहे.

महादेव जानू वारगुडे असे त्या शिक्षकाचे नाव आहे. वेतन वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेमुळे हे वारगुडे यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्‍याचे त्यांना सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून समोर आले आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

या पोस्टमध्ये ते म्हणाले, माझी सोन्‍यासारखी मुलं सोडून जाताना काय वेदना होतात, हे सरकारला आता तरी कळणार आहे की नाही. तासिका कर्मचाऱ्यांना लवकर कायम करा, अन्यथा पगारात वाढ करा. माझ्यासारखी प्रत्‍येकावर परिस्थिती यायला वेळ लागणार नाही. 

तसेच ते म्हणाले, अजून खूप जगावसं वाटत होते. पण वेळेवर पगार नाही, जगावे कसे हेच कळत नाही. मला माफ करा मी माझी मुलं अर्ध्यात सोडून जात आहे. संघर्ष करुन जगायचे होते, पण मन आतून पूर्णपणे तुटलेले आहे.

हे सरकार सर्वसामान्य माणसाला जगू देणार नाही. हेच का अच्छे दिन. नाय तिथे खर्च आणि आमचे पगार वेळेवर द्यायला पैसे नाही. अनुराज सॉरी बाळा. मिस यू, असे म्हणत त्यांनी आपले आयुष्य संपवले आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.