Rain Alert : राज्यात धो- धो पाऊस बरसणार, हवामान खात्याने दिला इशारा, ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार…

Rain Alert : सध्या हवामान खात्याने देशासह राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे आता ऐन रब्बी हंगामात राज्यात पावसाचा इशारा (Rain Alert) देण्यात आल्याने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यामध्ये कोकणसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मुसळधार पाऊस होईल. याशिवाय काही जिल्ह्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहिल, अशी माहिती देण्यात आली आहे. देशात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच यासोबत केरळमध्येही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळमधील मलप्पुरम, इडुक्की आणि पठानमथिट्टा जिल्ह्यांमध्ये आज म्हणजेच ६ नोव्हेंबर रोजी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. दरम्यान, देशातून मान्सून पूर्णत: परतला असून अनेक राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा घसरला आहे.

अनेक ठिकाणी नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसून येत आहेत. दुसरीकडे खरीप हंगामातील पिके काढणीला आली आल्याने शेतीकामाला वेग आला आहे. यामुळे यात आता पावसाची बातमी आल्याने चिंता वाढली आहे.

ऐन रब्बी हंगामात राज्यात पावसाचा इशारा (Rain Alert) देण्यात आल्याने शेतकऱ्यांचं टेन्शन वाढले आहे. अनेक पिके सध्या काढणीला आलेली आहेत. यामुळे पुन्हा एकदा नुकसान होणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावर आहे.