सध्या राज्यातील शेतकरी मोठ्या पावसाची वाट बघत आहेत. असे असताना पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकल्यामुळे राज्यात पावसाचे वारे वाहतील. त्यामुळे उद्यापासून राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो आहे. तर उत्तर महाराष्ट्रादेखील जोरदार पावसाची शक्यता आहे.
तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढणार असल्याची माहिती आहे. यंदा पावसाने अनेकांचे अंदाज चुकवले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.
पिकं वाचवण्यासाठी राज्यातील शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकत आहे. यामुळे उद्यापासून राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांमध्ये हळूहळू पावसाचं प्रमाण वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.