राज ठाकरेंनी आयुष्यात एकदाच निवडणूक लढवली, पक्ष कोणता? प्रतिस्पर्धी कोण? जाणून घ्या…

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील मैदानात उतरले आहेत. अमित ठाकरे हे मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून लढत आहेत. यामुळे पहिल्यांदाच ते निवडणूकीत उतरल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमित ठाकरे यांच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबातील दुसरी व्यक्ती निवडणूक लढवत आहे. याआधी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. यामुळे त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. आता कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे कुटुंबात बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव किंवा राज ठाकरे यांनी कधीच निवडणूक लढवली नाही. हे जरी सत्य असले तरी राज ठाकरे यांनी आयुष्यात फक्त एकदा निवडणूक लढवली होती. हे राज यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, माझ्या आयुष्यात मी कधी निवडणूक लढवली नाही. फक्त एकदाच लढवली होती, कॉलेजमध्ये असताना.

राज ठाकरे म्हणाले, क्लास रिप्रेजेंटेटिव (CR) ची ती निवडणूक होती. आमचे दोन वर्ग असायचे आणि दोन जे उमेदवार एकमेकांसमोर होते ते म्हणजे मी आणि कुणाल, अशी माहिती त्यांनी दिली. या निवडणुकीत राज ठाकरे विजयी झाले होते, अशी ती निवडणूक होती.

तसेच ते म्हणाले, आमच्याकडे कोणीही जिंकू दे, कोणीही हरू देत. त्यानंतरची पार्टी कॉमन असायची. त्यामुळे त्या जिंकण्याला काही अर्थ नव्हता. राज ठाकरे हे प्रसिद्ध लेखक, जाहिरातकार कुणाल विजयकर यांच्या ‘खाने मे क्या है’ या शोमध्ये आले होते. यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या.

यात शोमध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील लढलेल्या एकमेव निवडणुकीबद्दल सांगितले. यावेळी पत्नी शर्मिला आणि अमित ठाकरे तसेच मनसेचे नेते नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार आणि अन्य पदाधिकारी देखील सोबत होते.