राज्यात अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय सुरु आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस छापे टाकत असून आरोपींना ताब्यात घेत आहे. कोकणातूनही एक अशीच बाब समोर आली आहे. रत्नागिरी येथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रत्नागिरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ ही कारवाई त्या आरोपींवर करण्यात आली आहे. रत्नागिरी शहरात अनेक ठिकाणी असे प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे.
खेड तालुक्यातील चिंचवड परिसरातील दवाबिंदू फार्मवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे पोलिसांना कळले होते. त्यानंतर त्यांनी छापा टाकत कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती.
वेश्या व्यवसाय प्रकरणी रविंद्र गणपत गावडे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. तर त्याचदिवशी दुपारी एका महिलेवरही गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेण्यात आले आहे.
तसेच २० तारखेला पोलिसांनी रत्नागिरीच्या शिवाजीनगर परिसरातील एका बिल्डिंगच्या तळमजल्यात छापा टाकला होता. त्यामध्ये एक व्यक्ती दोन महिलांना कामाला ठेऊन तिथे वेश्या व्यवसाय चालवत होता. त्यातून पोलिसांनी पीडित महिलांची सुटका केली आहे. तर राजेंद्र चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे.
आतापर्यंत पोलिसांनी रत्नागिरीच्या वेश्या व्यवसाय प्रकरणी आठ जणांना ताब्यात घेतले आहे. अब्दुल डोंगरकर, ओमकार बोरकर, समीर लिबुकर, अरबाज चाऊस, साई साळुंखे, रोहन कोळेकर, प्रविण परब, नवीद कन्वाडकर असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहे.