---Advertisement---

रिक्षाचालकाने महिलेला निर्जन स्थळी नेलं, विवस्र केलं करून तोंड दाबलं अन्…; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

---Advertisement---

रिक्षा चालकाने महिलेचे अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न डोंबिवली येथे घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रिक्षा चालकासह त्याच्या एका साथीदाराला पोलिासांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

ही महिला खिडकाळेश्वर मंदिरात दर्शन घेऊन कोळेगाव येथे रिक्षातुन घरी येत होती. यावेळी रिक्षा चालकाने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन नको त्या रोडने फिरवले. नंतर निर्जन स्थळी नेऊन तिच्या वर साथीदाराच्या मदतीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यामुळे ती महिला घाबरली.

हा प्रकार सुरू असताना गस्तीवर असणाऱ्या डोंबिवली मानपाडा पोलिसांनी त्या आधीच या आरोपीना ताब्यात घेतले. यामुळे मात्र मोठी खळबळ उडाली असून प्रभाकर पाटील आणि वैभव तरे असे आरोपींची नावे आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. ज्या रिक्षात ती बसली. त्यात आणखी एक प्रवासी बसला होता. महिलेने रिक्षा चालकाला कोळेगावत जायचे असे सांगितले होते. मात्र असे न करता या रिक्षा चालकाने ही गाडी दुसरीकडेच वळवली.

या रिक्षाचालकावर महिलेला संशय आल्याने तिने रिक्षाचालकाला विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र शेजारी बसलेल्या प्रवाशाने तिच्या तोंडावर धारदार शस्त्र लावून दोन्ही हाताने तिचे तोंड दाबून धरले. यामुळे तिला हालचाल करता आली नाही.

पुढे गस्तीवर असणाऱ्या मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस बीट मार्शल सुधीर हसे आणि अतुल भोई हे होते. त्यांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग केला. त्यांच्या लक्षात हा प्रकार आल्याने महिलेवर अतिप्रसंग करणाऱ्या या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---