अनेकदा समाजासाठी प्राणी देखील महत्वाची भूमिका बजावतात, तसेच समाजसेवा करताना दिसतात, याची अनेक उदाहरण आपल्याला बघायला मिळतील. सध्या एका श्वानाची चर्चा आहे. अनेक वर्षे भारतीय लष्करात काम केल्यानंतर हा श्वान निवृत्त झाला असून AC ट्रेनमधून तो आपल्या घरी निघाला आहे. यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे.
सध्या या श्वानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे याची बरीच चर्चा आहे. अनेक जण या श्वानाचे कौतुक करताना दिसत आहेत, आणि त्याला शुभेच्छाही देताना दिसत आहेत. अनेकदा अशा प्रकारे अनेकांचे जीव देखील श्वानाने वाचवले आहेत.
या श्वानाला त्याच्या रिटायरमेंटनंतर खास सन्मान देण्यात आला. सेनाने या श्वानासाठी मेरठपर्यंत जाण्यासाठी फर्स्ट कोचमधून प्रवास घडवून दिला. याचा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडला आहे. 22 आर्मी डॉग युनिटचा आर्मी डॉग मेरू हा काही दिवसांपूर्वीच निवृत्त झाला आहे.
व्हिडिओ श्वानाला योग्य तो सन्मान दिला जातो आणि तो रेल्वे स्टेशनवर उभा आहे. त्यानंतर तो फर्स्ट क्लास एसीमधून आरामात ट्रेनने प्रवास करतो. मेरू हा 9 वर्षांनंतर निवृत्त झाला. आता मेरून आपल्या नव्या रिटारमेंट होममध्ये आपले उर्वरित आयुष्य अगदी सुखाने व्यतित करणार आहे. त्याला सगळ्या सोयी दिल्या जाणार आहेत.
@AshTheWiz नावाच्या ट्विटर अकांऊटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 22 आर्मी डॉग यूनिटमधून ट्रॅकर डॉग मेरू रिटायरमेंटनंतर मेरठला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसला आहे. आजचा दिवस तो रिमाऊंट एंड वेटरनरी कॉर्म्स (आरवीसी) सेंटरच्या डॉग्स रिटायरमेंट होममध्ये राहील.
रक्षा मंत्रालयाने नुकतेच सर्विस डॉग्सना त्यांच्या संचालकांसोबत एसी फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. हा व्यवस्था संरक्षण मंत्रालयाच्या उपक्रमाचाच एक भाग आहे. सेवानिवृत्तीनंतर इंडियन आर्मीतील श्वानांना एसी फर्स्ट क्लासमध्ये त्यांच्या हँडलरसह त्यांच्या सेवानिवृत्तीच्या घरी जाण्याची परवानगी दिली जाते, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये झळकलेल्या डॉगला अनेकांनी पाहिले. हा डॉग रेड कार्पेट एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणे अवतरला होता. वर्मोंट स्टेट युनिव्हर्सिटीच्या एका मांजरीला डॉक्टर ऑफ लिटरेचर ही मानद उपाधी देण्यात आली, तेव्हाही लोकांना आश्चर्य वाटले.