महात्मा गांधींचे खरे वडील करमचंद गांधी नसून मुस्लिम जमीनदार होते, माझ्याकडे पुरावे; संभाजी भिंडेंचा दावा

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे हे त्यांच्या विधानामुळे नेहमीच चर्चेत येत असतात. त्यांनी केलेली अनेक वक्तव्ये ही वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात. आताही त्यांनी असेच एक वक्तव्य केले आहे, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

महात्मा गांधी यांचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून मुस्लिम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत, असे वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी केले आहे.

अमरावतीतील एका कार्यक्रमात संभाजी भिडे बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडे यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात बोलत असताना संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल हे वादग्रस्त विधान केले आहे.

मोहनदास हे करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. त्याच जमीनदाराची रक्कम चोरुन ते पळून गेले होते. त्यामुळे संतापलेल्या जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीला पळवून घरी आणले होते आणि त्यांनाही आपल्या पत्नीसारखी वागणूक देत होते, असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.

त्यामुळे मोहनदास हे महात्मा गांधी यांचे खरे वडील नसून ते त्याच जमीनदाराचे पुत्र आहेत. महात्मा गांधी यांचे शिक्षण आणि त्यांचा सांभाळ त्याच जमीनदाराने केला होता. याचे माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत, असेही संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.

देशामध्ये सर्वधर्म समभावाचा उपदेश नको. अशा प्रकारचा उपदेश देणाऱ्या नेत्यांना देशातून हद्दपार केले पाहिजे. जगाच्या पाठीवर हिंदुस्थान हा एकमेव हिंदु बहुसंख्य देश आहे. हिंदुंचे शोर्य अफाट आहे. परंतू हिंदू स्वत:चा धर्म, स्वत:च्या जबाबदाऱ्या विसरला आहे, असेही संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.