Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी आईच्या प्रियकराने १४ वर्षाय मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत.
याबाबत माहिती अशी की, घटस्फोटानंतर गेल्या दहा वर्षापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आईच्या प्रियकरानेच १४ वर्षीय मुलीवर दुधामध्ये औषध देऊन अत्याचार केले. तसेच मुलीचे विवस्त्र अवस्थेत व्हिडिओ काढत मुलीला धमक्या दिल्या. यामुळे मुलगी खूप घाबरली होती.
यानंतर मुलीने घरातून पळ काढत पोलीस ठाण्यामध्ये जाऊन घडलेला प्रकार सांगितला. याबाबत पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये आईच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मुलगी दोन वर्षाची असताना तिच्या आईचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला.
नंतर अशपाक गफ्फर शेख या व्यक्तीसोबत आंतरजातीय दुसरा विवाह केला. असे असताना काही दिवसांनंतर अशपाक याने पीडितेच्या आईचा छळ सुरू केला. नंतर मुलीची आई बेपत्ता झाली. काही दिवसांनी सर्व कुटुंब पुंडलिक नगर भागामध्ये राहू लागले.
नंतर आरोपीने पीडित मुलगी ही मोठी झाल्यानंतर तिचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. मात्र मुलीने नकार दिला. अशपाकने मुलीला सांगितलेल्या स्थळी लग्न कर अन्यथा माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव, असे म्हणत बळजबरीने शरीरसंबंध ठेवले. रोजच हा प्रकार सुरू असल्याने मुलगी कंटाळली होती.
त्याने मुलीला वेगवेगळ्या पदार्थांमधून औषध देऊन मुलीला बेशुद्ध करून अत्याचार करू लागला. तसेच नग्न अवस्थेत फोटो देखील काढले. या त्रासाला कंटाळलेल्या मुलीने अचानक घर सोडून मैत्रिणीच्या घरी जाऊन हा प्रकार सांगितला.
त्यानंतर महिला सुरक्षा समितीच्या सदस्यांच्या मदतीने तिचा जबाब नोंदवून या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे मात्र खळबळ उडाली आहे.