Sambhajinagar news : सिल्लोड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. तू मला खूप आवडतेस, तू मला भेट, अन्यथा तुझ्या भावाला जिवंत मारून टाकेन, अशी धमकी देऊन 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. नंतर तरुणीने बदनामीच्या भीती पोटी विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
असे असताना याबाबत गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात ही घटना घडली आहे. मच्छिंद्र रामू घोडके (वय 25 वर्षे) असे आत्महत्या करण्याऱ्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. तरुणीच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आपली बदनामी होईल या भीतीने तरुणीने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याचे माहित होताच तरुणाने छत्रपती संभाजीनगर शहरात बहिणीकडे आला असतांना गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
तरुणाने 19 वर्षीय पिडीत मुलीला धमकी देऊन भाड्याने घेतलेल्या रूमवर बोलावून तिच्यावर बलात्कार केला. नंतर मुलीने तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मंगळवारी पहाटे बदनामीच्या भीतीने या मुलीने विषारी द्रव प्राशन केले.
पीडितेला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार करण्यात येत आहे. नंतर तरुणाला आपल्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे बहिणीच्या घरीच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.