SambhajiNagar : विद्यापीठात तुफान राडा! आंबेडकरवादी तरुणांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना बदडलं, नेमकं काय झालं?

Sambhajinagar : आक्षेपार्ह पद्धतीने भिंतलेखन केल्याच्या मुद्यावरुन आज छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राडा झाला. याठिकाणी आंबेडकरवादी तरुणांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे.

यामुळे मोठा राडा बघायला मिळाला. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस विद्यापीठ परिसरात दाखल झाले आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी विद्यापीठ बंदची हाक देण्यात आली आहे. 

याबाबत पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, या विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थी संघटना आपल्या प्रचारासाठी भिंतलेखन, पोस्टर अशा विविध मार्गांचा अवलंब करतात. यामुळे अनेकदा यावरून वाद होतो.

विद्यापीठ परिसरात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी Join ABVP, ABVP असे लिहिले आहे. यामुळे मात्र परिसरात सगळीकडे याच आशयाचे चित्रण दिसून येत होते. ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर Join ABVP लिहिण्यात आले.

त्यावरून काही विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे आंबेडकरवादी तरुणांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना याबाबत जाब विचारत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सध्या विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण आहे. 

याबाबत पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. तसेच विद्यापीठ बंदची हाक देखील देण्यात आली आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. विद्रुपीकरण करणाऱ्या अभाविपवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी एसएफआयने केली आहे.