समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अतिउच्चता वाहिनीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंनी वाहतूक मंगळवार दिनांक १० ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक १२ ऑक्टोबर दरम्यान बंद राहणार आहे.
दुपारी १२ ते साडेतीन आणि २५ व २६ ऑक्टोबर रोजी १२ ते ३ या वेळेत समृद्धी महामार्ग Samriddhi Highway बंद राहणार आहे. यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अतिउच्च दाबवाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे.
यासाठी पाच दिवस तीन तासांसाठी समृद्धी महामार्ग Samriddhi Highway बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता रामदास खलसे यांनी दिली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे. नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सावंगी इंटरचेंज- जालना महामार्गावरून विरुद्ध दिशेने निधोना-जालना समृद्धी महामार्गावर प्रवेश करून नागपूरकडे वळवण्यात येणार आहे.
इंटरचेंज-निधोना एमआयडीसी जालना महामार्गावरून संभाजीनगर केंब्रिज शाळा उजवीकडे वळून सावंगी बायपास सावंगी इंटरचेंजहून शिर्डीच्या दिशेने प्रवासी जाऊ शकतात. पाच दिवस याठिकाणी प्रवाशांना पर्यायी मार्ग वापरावे लागतील.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. यामुळे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अधिवेशनात याबाबत देखील चर्चा झाली होती.