---Advertisement---

Sangli news : सांगलीत खळबळ! घराला करंट देऊन संपूर्ण कुटूंबच संपवण्याचा प्रयत्न, हादरवणार कारण आलं समोर…

---Advertisement---

Sangli news : सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील कडेगाव तालुक्यात वांगी गावात एका घराला 11 केव्हीचा करंट देऊन संपुर्ण कुटूंब संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत चिंचणी वांगी पोलिसांनी गावातील एका व्यक्तीस अटक केली.

गजानन बडार यानेच तक्रार दिलेल्या कुटुंबातील लोक विजेचा शॉक लागून सर्वजण ठार होतील, या उद्देशाने वायर घराला अडकवल्याचे सांगितले जात आहे. शशिकांत वडारचे निकम कुटुंबाशी चांगले संबंध आहेत.

असे असताना मात्र वडीलार्जित जमिनीचा काही दिवसापासून वाद सुरु होता. या वादाचा निकाल हा शशिकांत वडार यांच्या बाजूने लागला. त्यामुळे या कामात सुरज निकम यांनी शशिकांत वडार यांना मदत केल्याचा संशय आरोपी गजानन वडारला होता.

यामुळे गजानने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास चिचणी वांगी पोलीस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलिस अंमलदार हरिदास पवार,  संपत जाधव, दीपक यादव, गणेश तांदळे यांनी केला. 

दरम्यान, रात्रीच्या वेळी जेवण करून झोपी गेले. रात्री एक वाजता अचानक घरासमोर विजेचा मोठा जाळ झाला व घरातील लाईट गेली. दुसऱ्यांदा वीज आल्यानंतर घरालगत जाळ झाल्यामुळे त्यांनी घरातील सर्वांना जागे केले. 

दरम्यान, बाहेर पाहिल्यास त्यांना विज वाहक तार घराच्या दरवाजाजवळ अडकवलेली दिसून आली. 11 केव्ही या तारेतून घराच्या पुढील व मागील दरवाजास विद्युत वाहक तारेने कंरट दिल्याचे दिसून आले, यामुळे त्यांना धक्काच बसला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---