Sassoon Hospital pune : नांदेड जिल्हा रुग्णालयात अतिशय भोंगळ कारभार सुरु असल्याची घटना ताजी असताना आता पुण्यातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ससून रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी दर दिवशी सरासरी १८ रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे याची चर्चा सुरू आहे. सरकारी रुग्णालयाची झालेली अवस्था हा सध्या चर्चेत असणारा विषय आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयातील सुविधा आणि मनुष्यबळ अपुरे पडत असल्याची स्थिती आहे. रुग्णालयाच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल होत असल्याने सर्वच विभागांत उपचार घेण्यासाठी रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते.
रुग्णालयात पुणे शहर, जिल्ह्यासह सांगली, सातारा, सोलापूर, नगर आणि राज्यभरातून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. यामुळे याठिकाणी प्रशासनावर मोठा ताण आहे. यामुळे याठिकाणी जास्त लक्ष दिले जात नसल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे रुग्णालयावरचा ताण प्रचंड वाढल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयातील आंतररुग्ण विभागात दिवसाला एक हजार ८० रुग्ण दाखल होतात. मात्र त्या तुलनेत तशा सुविधा उपलब्ध नाहीत.
दरम्यान, खासगी रुग्णालयात दाखल असलेला रुग्ण जास्त आजारी असेल तर त्याला ससून रुग्णालयात दाखल केले जाते. त्यामुळे मृत्यू ‘ससून’मध्ये झाला, अशी नोंद केली जाते, असे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.