साताऱ्यात देवदर्शनाला चाललेल्या ओम्नी गाडीचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू तर ५ गंभीर जखमी; अपघाताची भीषणता वाचून थरकाप उडेल

गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताच्या अनेक घटना घडत आहे. त्यामध्ये अनेकांना आपला जीवही गमवावा लागत आहे. आता अशीच एक घटना साताऱ्यातून समोर आली आहे. एक गाडी झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.

खटाव तालुक्यातील सुर्याचीवाडी या गावात हा अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये चारजण ठार झाले आहे तर पाचजण गंभीर जखमी झाले आहे. सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

बनपुरी आणि सिद्धेश्वर कुरोली येथील आठजण देवदर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. गाडी झाडाला धडकल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये तीनजण जागीच ठार झाले होते. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सिद्धेश्वर कुरोलीतील पांडुरंग देशमुख यांच्या ओमनी गाडीतून कुरोली आणि बनपुरी येथील काही भाविक लोकरेवाडी येथील संत बाळूमामांच्या दर्शनासाठी निघाले होते. अशात सुर्याचीवाडी येथे चालकाचा गाडीवरुन ताबा सुटला. त्यामुळे गाडी थेट एका झाडाला धडकली.

या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. पाचजण जखमी असलेल्यांपैकी दोघांची प्रकृती आता स्थिर असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे.