सयाजी शिंदे हे त्यांच्या अभिनयासाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी मराठी चित्रपटांमध्येच नाही तर तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम असा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांच्या अभिनयासोबतच ते सामाजिक कामांमुळेही चर्चेत असतात.
अशात ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. त्यांनी एक अशी गोष्ट सांगितली आहे. त्यामुळे राज्यभरात त्यांचे कौतूक केले जात आहे. सयाजी शिंदे यांनी आपल्या आईला ५०० वर्षे जीवंत ठेवण्यासाठी काय केलं आहे ते त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे कौतूक होत आहे.
सयाजी शिंदे यांनी आपल्या आईला ५०० वर्षे जीवंत ठेवण्यासाठी अजब शक्कल लढवली आहे. एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या आईला जीवंत ठेवण्यासाठी काय केलंय ते सांगितलं आहे. शिंदेंनी आपल्या आईला ५०० वर्षे जीवंत ठेवण्यासाठी तिच्या वजना इतक्या बिया राज्यभर पेरण्याचा निर्णय घेतला आहे.
माझे माझ्या आईवर खुप प्रेम आहे. प्रत्येकाला वाटचे आई जगावी. ती जीवंत कायम जीवंत राहायला हवी, मलाही वाटते. पण ते शक्य नाहीये. मग ती कायम जीवंत कशी राहणार? मला माहितीये ती ५०० वर्षे जीवंत नाही राहणार, पण ती कायम जगावी यासाठी मी एक गोष्ट केली आहे, असे सयाजी शिंदे यांनी म्हटले आहे.
मी माझ्या आईला सांगितले की, मी एक काम करतो तुझ्या वजना इतक्या देशी झाडांच्या बिया घेतो. त्या बिया मी महाराष्ट्रात लावतो. म्हणजे झाडाला आलेल्या फुलांच्या सुगंधात तू कायम असशील. त्या झाडांच्या फळांमध्ये कायम मला तु दिसशील. सावलीत कायम तु राहशील, असे सयाजी शिंदे यांनी म्हटले आहे.
मी झाडं लावतो पण मी त्याला सामाजिक काम म्हणत नाही. मला त्याची आवड आहे. मी आईला वचन दिले होते की, तुझ्या वजनाएवढ्या बिया मी लावेल. प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचे ऋण फेडायचे असेल तर असे केले पाहिजे, असेही शिंदेंनी म्हटले आहे. त्यांच्या या गोष्टीचे राज्यभरात कौतूक केले जात आहे.