प्रेम या शब्दाला मोठा अर्थ आहे. प्रेमात अनेकजण वेडे होतात तर काहीजण यशस्वी होतात. प्रेम हे कोणावर करावं याच्या व्याख्या देखील आहेत. आजकाल प्रेम नेमकं काय असतं आणि ते कोणावर करायचं आणि कोणावर नाही याचा प्रश्नच पडतो.
समाजात काही नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि लग्न होऊ शकतं नाही. शास्त्रानुसार रक्ताच्या नात्यात लग्न होतं नाही, कारण रक्ताच्या नात्यामुळे पुढील पिढीत जनुकीय दोष निर्माण होण्याची भीती असते. मात्र एका विचित्र घटनेमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. एका बहीण भावाने लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. अमेरिकन जोडपे डेटिंग करत होते. ते प्रेमात पडले आणि काही काळानंतर त्यांना कळलं ते बहीण भाऊ आहेत. मात्र ते मागे सरकले नाहीत.
ही लव्हस्टोरी तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. ती तरुणी म्हणाली आम्ही जरी नात्याने बहीण भाऊ असो तरी त्यांना काही फरक पडत नाही कारण ते एकमेकांवर खूप प्रेम करतात. आणि यापुढे देखील करत राहणार, असेही त्यांनी सांगितले आहे.
अमेरिकेतील उटाहमधील हा प्रकार आहे. २० वर्षीय टिकटोकर केन्ना हिने व्हिडीओ शेअर करत आपली प्रेम कहाणी सांगितली आहे. ती म्हणाली की तिने तिच्या चुलत भावाशी लग्न केलं आहे. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे.
ती म्हणाली की, ६ महिन्यांच्या डेटिंगनंतर तिला डीएनए चाचणीतून कळलं की दोघेही चुलत भावंड आहेत. यानंतरही त्यांच्या प्रेमात बदल झाला नाही तर त्यांनी एक वर्षानंतर लग्न केले. त्यांचा संसार देखील सुरळीत चालू आहे. तरूणीची लव्ह स्टोरी ऐकून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या जोडप्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
नेटकऱ्यांना बहीण भावाचं हे लग्न मान्य नाही. हे नातं बेकायदेशीर असून भविष्यात अशी नाती जेनेटिक्स बिघवणार अशी भीती नेटकऱ्यांनी उपस्थित केली आहे. यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.