उद्धव ठाकरे यांनी लोकसभेसाठी अजून चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये बहुचर्चित लढत असलेल्या कल्याण मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. ठाकरे गटाने आतापर्यंत २१ उमेदवारांची घोषणा केली आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यामध्ये चार नावांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे ही एक मोठी लढत असणार आहे.
हातकणंगलेमधून देखील ठाकरे यांनी उमेदवार दिला आहे. सुरुवातीला याठिकाणी राजू शेट्टी यांना पाठिंबा मिळेल असेही म्हटले जात होते. सत्यजित पाटील आणि पालघरमधून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर करण्यता आली आहे. तर नुकतेच उन्मेष पाटील यांच्यासोबत भाजपमधून ठाकरे गटात पक्षप्रवेश केलेले करण पवार यांना जळगावमधून लोकसभेचं तिकीट दिलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे २१ उमेदवारांची नावे…
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
मावळ – संजोग वाघेरे-पाटील
सांगली -चंद्रहार पाटील
हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
नाशिक – राजाभाई वाजे
रायगड – अनंत गीते
सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
ठाणे – राजन विचारे
मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर
परभणी – संजय जाधव
मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
वैशाली दरेकर : कल्याण
सत्यजित पाटील : हातकणंगले
करण पवार : जळगाव
भारती कामडी : पालघर