‘ती’ चूक केली अन् पाकीस्तानची सीमा हैदर अलगद अडकली ATS च्या जाळ्यात; वाचा चौकशीत नेमंक काय घडलं

पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरची संपुर्ण देशभरात चर्चा होत आहे. ती सचिनच्या प्रेमापोटी पाकिस्तानातून भारतात आल्याचे तिने सांगितले होते. पण तिच्यावर संशय असल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

सीमा हैदर ही पाकिस्तानी एजंट असल्याचा संशय उत्तर प्रदेश एटीएस आणि पोलिसांना आहे. त्यामुळे तिची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीतूनही अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहे. तिचे काका आणि तिचा भाऊ लष्करात असल्याचे समोर आले होते.

तसेच सीमाची चौकशी सुरु असून दिवसांदिवस तिच्यावरचा संशय वाढताना दिसत आहे. तिने समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे तिच्यावरचा संशय वाढत आहे. अशात तिने चौकशीत इतके स्पष्टपणे इंग्रजी वाजले आहे, की तिथले अधिकारीही आश्चर्य चकीत झाले आहे.

आपण निरक्षर, अशिक्षित असल्याचा दावा सीमाने केला होता. पण तरीही पोलिसांनी तपास म्हणून तिला इंग्रजी वाचण्यास सांगितले होते. त्यावेळी तिने न अडखळता अगदी सहजपणे इंग्रजी वाचून दाखवले आहे. त्यामुळे एक अशिक्षित महिला इंग्रजी इतक्या स्पष्टपणे कसे बोलू शकते, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.

विशेष म्हणजे ती पाकिस्तानच्या ज्या भागात राहत होती, तिथे उर्दू भाषाचा वापर केला जातो. तरीही सीमाची इंग्रजी आणि हिंदी चांगली असल्यामुळे एटीएसचा तिच्यावरचा संशय अजून वाढला आहे. पण त्यावरही तिने उत्तर दिले आहे.

मी रोज पबजी खेळत होती. त्यामुळे अनेक भारतीय तरुणांशी मी संवाद साधायचे. त्यामुळे मला हिंदी भाषा कळू लागली, असा दावा सीमाने केला आहे. पण एटीएसला हे उत्तर समाधानकारक वाटलेले नाही. कारण सचिनची बोलीभाषा थोडी वेगळी आहे. सध्या तरी सीमावर कोणती कारवाई करण्यात आलेली नाही, पण अजून एटीएसने तिला क्लीनचीटही दिलेली नाही.