Sharad Mohol murder : मोहोळच्या हत्येचा प्लान महिन्यापूर्वीच, गोळ्या मुन्नाने झाडल्या, पण खरा मास्टरमाईंड मामाच

Sharad Mohol murder : पुणे शहरातून काल एक मोठी बातमी समोर आली. याठिकाणी भरदिवसा गोळीबार झाला. पुण्यातील उच्चभ्रू रहिवाशांचा परिसर असलेल्या कोथरूड परिसरात हा गोळीबार झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या घटनेत शरद मोहोळ याला तीन गोळ्या लागल्या आहेत. यामध्ये रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते घटनेनंतर पोलिसांनी याठिकाणी धाव घेतली. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात ही घटना घडली.

आता याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्याच्या साथीदाराने त्याचा गेम वाजवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याचे नाव समोर आले होते. मात्र, आता पहिल्यांदाच यामागचा मास्टरमाईंड समोर आला आहे.

हत्येनंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आठ जणांना सातारा रस्त्यावरील शिरवळ जवळून अटक केली आहे. मुठा खोऱ्यातील गुन्हेगारी वर्चस्ववादातून हा खून झाला आहे. नामदेव कानगुडे उर्फ मामा हा या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे.

पोळेकरसह दोन जणांना मोहोळ टोळीत महिनाभर आधी घुसवून ही हत्या करण्यात आली. शरद मोहोळचा खून करणारा मुन्ना कोळेकर महिन्याभरापासून शरद मोहोळकडेच काम करत होता. दोघे सोबत असायचे.

टोळीचा सदस्य म्हणून तो त्याच्या सोबत होता. असे असताना पैशांवरून दोघांमध्ये वाद उडाला होता. यामुळे त्याने हे कृत्य केले आहे. घटनेदिवशी सकाळपासून ते सोबत असल्याची माहिती मिळाली आहे. सोबत त्यांनी जेवण देखील केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, कोथरूडमधील सुतारदरा परिसरात ही घटना घडली आहे. गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरुन आरोपी फरार झाले होते. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.