मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. ते अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात सापडत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुलीबद्दल एक पोस्ट केली होती. तेव्हाही ते वादात सापडले होते.
मुलीने आरक्षण नसतानाही सर्व मिळवून दाखवलं असे शरद पोंक्षेंनी म्हटले होते. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे ते वादात सापडण्याची शक्यता आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी वेगवेगळे कार्यक्रम पार पडले होते. अशात नाशिकमधील मालेगावमध्ये एका कार्यक्रमासाठी शरद पोंक्षेंना प्रमुख पाहूणे म्हणून बोलवण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
एक तर तू गांधी नाही आणि सावरकरही नाही. हे काही ओरिजिनल गांधी नसून ते खान आहेत. ते महात्मा गांधींचे वंशज नाहीत. तर त्यांच्या आडनावाचा फायदा त्यांनी घेतला आहे. ते फिरोज खान यांची पुढची पिलावळ आहे, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे.
या मुर्खांना यांच्या आजीचा इतिहास माहिती नाही तर यांना सावरकांचा इतिहास कसा माहिती असणार? राफेल प्रकरणातही त्यांनी सुप्रिम कोर्टात माफी मागितली. जोपर्यंत अपील करण्याची संधी आहे. तोपर्यंत हे कोर्टामध्ये माफी मागत असतात. सावरकर प्रकरणातही हेच झाले, असेही शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे.
मालेगावमध्ये विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर एक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी शरद पोंक्षेंना मालेगावमध्ये बोलवण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री दादा भुसे सुद्धा उपस्थित होते.