अनेक कलाकारांची मुले आपल्या आईवडिलांमुळे कला क्षेत्रात उतरत असतात. पण काही कलाकारांच्या मुलांची स्वप्ने ही लहानपणापासूनच वेगळी असतात. त्यांना कलाकार नाही, तर दुसरं काही तर बनून स्वत:ला आईवडिलांसमोर सिद्ध करुन दाखवायचं असतं.
प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांच्या मुलीनेही असेच काहीसे करुन दाखवले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत शरद पोंक्षे हे मोठे नाव आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहे. पण त्यांची मुलगी सिद्धीने एका वेगळ्या क्षेत्रात नाव कमावलं आहे.
शरद पोंक्षे यांची मुलगी वैमानिक झाली आहे. शिक्षण घेण्यासाठी ती परदेशात सुद्धा गेली होती. याबाबत शरद पोंक्षे यांनी माहिती दिली होती. आता सिद्धीचे शिक्षण पुर्ण झाले असून ती वैमानिक बनली आहे. त्यामुळे शरद पोंक्षे यांनी एक खास पोस्ट केली आहे.
कू सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण, कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे अडथळे पार करत. कोणतीही सवलत, आरक्षण नसताना केवळ मेहनत, बुध्दीमत्ता, परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली.बापाला आणखी काय हव नाही का? असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
तसेच पोस्टमध्ये पुढे ते म्हणाले की, आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी . मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे. करशिलच खात्रीच आहे. लव यू. सध्या शरद पोंक्षे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.
सिद्धी ही लहानपणापासूनच हुशार होती. ती अभिनय क्षेत्रात येईल, असे वाटत होते. पण तिला लहानपणापासूनच पायलट बनण्याची इच्छा होती. आपल्या स्वप्नाला वडिलांचीही साथ मिळाल्यामुळे तिने शिक्षण पुर्ण करत आपले स्वप्न पुर्ण केले आहे.