कोणाचे नशीब कधी चमकेल आणि कधी नाही हे कोणाला सांगता येत नाही. आता यासंबंधित एक घटना घडली आहे. एका दिवसात तीन हजार ५०० शेअर्स विकत घेणारी व्यक्ती रातोरात अब्जाधीश होईल याचा कदाचितच कोणी विचार केला असेल का.?यामध्ये नशीबाने सगळं बदललं आहे.
केरळमधील बाबू जॉर्ज वालावी नावाच्या व्यक्तीने सुमारे ४५ वर्षांपूर्वी ३५०० शेअर्स खरेदी केले आणि नंतर विसरले. दोन वर्षांपूर्वी या शेअर्सचे मूल्य ११४८ कोटी रुपये झाले आहे. त्यांनी १९७८ मध्ये मेवाड ऑइल आणि जनरल मिल्स लिमिटेडचे ३५०० शेअर्स खरेदी केले होते. यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत स्टॉक खरेदी केल्यानंतर बाबू कंपनीचे २.८% भागधारक झाले. असे असताना तब्बल ४५ वर्षांपूर्वी हे शेअर्स खरेदी केल्यानंतर विसरले आणि आता या शेअर्सचे मूल्य १,४४८ कोटी रुपये इतके वाढले होते. यामुळे नशीब पण कस असत हे यावरून दिसून येते.
याबाबत ते म्हणाले, कंपनीचे संस्थापक अध्यक्ष पीपी सिंघल आणि मी त्यावेळी मित्र होतो. शेअर्स खरेदी करताना कंपनी अनलिस्टेड असल्याने आणि कोणताही लाभांश देत नसल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला या गुंतवणुकीचा विसर पडला.
पुढे २०१५ मध्ये या गुंतवणुकीची आठवण आल्यावर आम्ही आमची चौकशी सुरू केली. तेव्हा आम्हाला धक्काच बसला. बाबूने कंपनीवर आरोप केला की, १९८९ साली कंपनीने बनावट कागदपत्रांचा वापर करून आपले शेअर्स बेकायदेशीरपणे दुसऱ्याला विकले.
याबाबत कंपनीने म्हणाली ते यापुढे कंपनीचा भागधारक नाही. कारण हे शेअर्स १९८९ मध्ये दुसऱ्याला विकले गेले होते. दरम्यान, कंपनीने त्यांना पैसे देण्यास नकार दिल्यावर बाबूंनी सेबीचा दरवाजा ठोठावला. यामुळे याची चर्चा सुरू आहे.