आंघोळ करताना महिलेचा धक्कादायक मृत्यू, हादरवणारी माहिती आली समोर…

श्रीगंगानगरच्या गजसिंगपूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याठिकाणी बाथरूममध्ये बसवण्यात आलेल्या गॅस गिझरच्या गळतीमुळे गुदमरून एका महिलेचा मृत्यू झाला. याबाबत तपास सुरू आहे.

गॅस गिझरमुळे झालेला हा मृत्यू आहे. जानेवारीपासून आतापर्यंत सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. हरकिशन यांची पत्नी 35 वर्षीय संतोष देवी रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आंघोळ करत होत्या.

यावेळी बाथरूममधील गॅस गिझरमधून गळती झाली. यात गुदमरल्याने त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना बाहेरून आवाज दिला मात्र त्या काहीच बोलल्या नाहीत. यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दार उघडले असता त्या बेशुद्ध दिसून आल्या.

त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संतोषी या नगरात सहाय्यक म्हणून काम करत होत्या. या घटनेमुळे कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांना दोन मुली आहेत. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या घरामध्ये नागरिकांची गर्दी झाली होती.

दरम्यान, बाथरूममध्ये योग्य वेंटिलेशन व्यवस्था नसल्यास, आंघोळ करणाऱ्या व्यक्तीला गुदमरते. यामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो. गॅस गिझर चालवल्याने आणि त्यातून निर्माण होणारा कार्बन मोनोऑक्साइड वायू शरीरात पोहोचतो आणि लाल रक्तपेशींना नुकसान होऊ शकते.

यामुळे याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. हिमोग्लोबिन रेणू अवरोधित होतो आणि शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह प्रतिबंधित होतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, अस्वस्थता येते. देशात अनेक ठिकाणी अशा प्रकारे घटना समोर येत आहेत.