राज्यात मोठ्या धुमधडाक्यात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. 10 दिवस कसे गेले हे समजले देखील नाही. असे असताना बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत राज्यभरात १७ जणांचा मृत्यू झाल्याने उत्सवाला गालबोट लागले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
यापैकी १२ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मात्र काही ठिकाणी व्यवस्थित विसर्जन मिरवणुका निघाल्या. यामध्ये नऊ मृत्यू हे नाशिक जिल्ह्यातील आहेत. तर रत्नागिरीत दोन, विदर्भात दोन, पुणे जिल्ह्यात दोन, मुंबई आणि जळगावमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे येणाऱ्या काळात काळजी घेणे गरजेचे आहे.
यामध्ये नाशिकमधील गोदावरी नदीत आठ जण बुडाले. तसेच अंबड परिसरात विसर्जन मिरवणूक सुरू असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट गणेशभक्तांच्या दिशेने गेलेल्या ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला.
तसेच पुण्यात येरवड्यातील विसर्जन मिरवणुकीत नाचताना गणेश दळवी हा गणेशभक्त बेशुद्ध पडला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तसेच पिंपरीत अर्णव पाटील या पाच वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला आहे.
तसेच यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात गणपती विसर्जनादरम्यान दोघांचा बुडून मृत्यू झाला. जळगावमध्ये बुडून एकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. यामुळे यावर्षी देखील गणेश विसर्जन मिरवणुकीत मृत्यूचा आकडा तसाच राहिला आहे.