---Advertisement---

धक्कादायक! लाखो रूपये कमावणारे गौतमी पाटीलचे वडील सापडले ‘त्या’ अवस्थेत, घटनेने उडाली खळबळ…

---Advertisement---

लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील सतत चर्चेत असते. तिचे लाखो चाहते राज्यभर आहेत. तिची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. असे असताना आता गौतमीचे वडील बेवारस अवस्थेत सापडले आहे. यामुळे एकच चर्चा सुरू आहे.

रवींद्र बाबुराव नेरपगारे पाटील असे गौतमीच्या वडिलांचे नाव आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धुळे शहरात ते सापडले. स्वराज्य फाउंडेशनच्या दुर्गेश चव्हाण यांना याबाबत मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी घटनास्थळी जाऊन वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले.

त्यांचे आधार कार्ड टाकल्यानंतर सदर व्यक्ती गौतमी पाटीलचे वडील रवींद्र बाबुराव पाटील असल्याचे समोर आले. दुर्गेश चव्हाण यांनी गौतमीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांचे काही नातेवाईक हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. 

दरम्यान, त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच गौतमी पाटीलची काकू आणि तिची चुलत बहीण हे रुग्णालयात दाखल झाले. असे असताना आता त्यांनी गौतमी पाटीलशी आमचा काहीही संबंध नाही, असे सांगितले. 

दरम्यान, गौतमीने राज्याला वेड लावले आहे. तिचा ‘घुंगरू’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात तुफान राडा, नोटांची उधळण होत असते. तिच्या अनेक चाहते आहेत.

तसेच गौतमी आपल्या नृत्याला अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप तिच्यावर अनेकांनी केला होता. पण तरीही तिने याकडे लक्ष न देता आपले काम सुरूच ठेवले. तिच्या कार्यक्रमात अनेकदा वाद होत असल्याचे देखील दिसून आले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---