दोघांना चिरडणाऱ्या २ कोटींच्या पोर्शे कारबद्दल धक्कादायक माहिती समोर, आता RTO देखील अडकणार…

पुण्यातील कल्याणीनगर भागात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. ते जबलपूरचे होते. यामुळे कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणी रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे.

याप्रकरणी वेदांत अग्रवाल याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आता त्यांच्याबाबत पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी अल्पवयीन मुलाला बार आणि पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांनाही अटक करण्यात आली आहे.

या मुलाने चालविलेल्या कारला नंबर देखील नव्हता. तसेच आता ही कार विनानोंदणीच (विनारजिस्ट्रेशन) रस्त्यावर धावत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे याबाबत अनेकजण अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही कार इतके दिवस विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत पुणे पोलिसांवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. सर्वसामान्य लोकांवर कारवाईचा दंड ठोठवणारे पोलीस मार्चपासून ही कार विनाक्रमांक धावतेय, हे का बघू शकले नाही? असेही सांगितले जात आहे. यामुळे पोलिसांवर देखील कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, या आरोपी मुलाने सांगितले आहे की, मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वाहन चालविण्याचा परवानाही नाही, तरीदेखील वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली, तसेच मित्रांसमवेत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करीत असल्याचेही वडिलांना माहिती आहे.

दरम्यान, या प्रकरणात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील एका आमदारावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे आता कारवाईची मागणी केली जात आहे. पोलीस हे आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपींना व्हीआयपी सोय केली जात आहे.