भाऊ अन् काका पाकिस्तानी लष्करात; सीमाची चौकशी करताच धक्कादायक माहिती झाली उघड

प्रेमासाठी कायपण म्हणत तरुण-तरुणी हे अनेक हैराण करणाऱ्या गोष्टी करत असतात. अशीच एक पाकिस्तानी महिला चर्चेचा विषय ठरली आहे. ती आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानमधून भारतात आली आहे. सीमा हैदर असे तिचे नाव आहे.

सीमाचे सचिनवर खुप प्रेम असल्यामुळे तिने पाकिस्तानातील सर्व नाती सोडून भारत गाठले आहे. अशात सीमा बाबत रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहे. तसेच काहींनी तर ती पाकिस्तानी एजंट असल्याचेही म्हटले आहे.

आता याप्रकरणी पोलिसांनी सीमा हैदरला ताब्यात घेतलं आहे. सुरक्षा एजन्सीने दखल घेतल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी सीमाला नोएडातून ताब्यात घेतलं आहे. पोलिस सध्या सीमाला कुठे घेऊन गेलेत याबद्दल माहिती मिळालेली नाही. पोलिस तिची चौकशी करत असल्याचे म्हटले जात आहे.

सीमा पाकिस्तानमधून भारतात कशी आली? याबाबत चौकशी केली जात आहे. तसेच तपास करण्यासाठी गाजियाबाद पोलिसांनी एटीएसचीही मदत घेतली आहे. सीमा नोएडावर हल्ला करु शकते, अशी भिती असल्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

सीमाच्या चौकशीतून मोठे खुलासे होत आहे. सीमाचा भाऊ हा लष्करात असल्याचे समोर आले होते. आता तिचे काकाही पाकिस्तानी लष्करात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणाची पोलिस आणि एटीएस कसून चौकशी करत आहे.

सीमाचे सचिनवर खरंच प्रेम आहे की तिचे पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी काही संबंध आहे यावरुन तिची चौकशी करण्यात येत आहे. भाऊ आणि काका पाकिस्तानी लष्करात असल्यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहे. तसेच ती पाकिस्तानमधून भारतात बेकायदेशीरपणे आली तरी कशी? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.