पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. पण ती पाकिस्तानी एजंट असल्याचा संशय आहे, त्यामुळे एटीएसने तिला ताब्यात घेतलं आहे. सध्या तिची चौकशी केली जात आहे.
सीमा हैदरबद्दल रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता पुन्हा एक खुलासा चौकशीमध्ये झाला आहे. तिने सोशल मीडियावर सीमा हैदर म्हणून ओळख कधीच सांगितलेली नव्हती, असे समोर आले आहे. त्यामुळे तिच्यावरचा संशय आणखी वाढला आहे.
सीमाने सांगितले आहे की, जेव्हा ती पब्जी खेळायची तेव्हा गेममध्ये तिचे नाव वेगळे होते. तिने त्यासाठी नवीन आयडी बनवला होता. त्या आयडीचे नाव मरियम खान असे होते. पाकिस्तानमध्ये ओळख पटली तर वाईट वागणूक मिळते त्यामुळे तिने हे नाव निवडले होतं.
मरियम खान नाव वापर असा सल्ला तिच्या ओळखीच्या लोकांनी दिला होता. ती रात्री ९ वाजेपर्यंत पब्जी खेळायची. पब्जी खेळत असतानाच तिची ओळख सचिनशी झाली. सुरुवातीला सचिनलाही मरियम खान नावानेच आकर्षिक केल्याचे तिने सांगितले आहे.
दोघांची ओळख वाढली आणि त्यांनी एकमेकांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलायला सुरुवात केली. त्यांच्या या मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे कळलंच नाही. त्यामुळे तिने भारतात येण्याचा निर्णय घेतला. सचिन पाकिस्तानला येण्यासाठी तयार होता, पण आपण येते म्हणत ती भारतात आली, असाही खुलासा झाला आहे.
सध्या तरी पोलिसांच्या हातात सीमा हैदरविरुद्ध कोणताही पुरावा नाहीये. पण सचिन आणि सीमा या दोघांचीही कसून चौकशी केली जात आहे. युपी एटीएसचा तपास पुर्ण झाला असला तरी सीमा हैदरला अजूनही क्लीन चीट देण्यात आलेली नाही.