पुण्यात पुन्हा गोळीबार! गोळ्या झाडून एकाला संपवलं अन् नंतर स्वतःलाही…, धक्कादायक कारण आले समोर

राज्यात सध्या गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालला आहे. नुकताच कल्याणचे पूर्व विभागाचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्थानकात महेश गायकवाड यांच्यावर हल्ला केला होता.

पैसा, प्रॉपर्टीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात होता. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरु असताना मॉरेस भाईने गोळ्या झाडल्या आणि स्वत:ही आत्महत्या केली. यामुळे खळबळ उडाली होती.

या २ घटनांनी महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. त्यानंतर या घटनांची पुनरावृत्ती पुण्यात झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पैशाच्या वादातून आरोपीने एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा पुणे हादरलं आहे.

त्याने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील एका हॉटेलबाहेर झालेल्या वादातून एका ५२ वर्षीय व्यक्तीने ज्वेलरी दुकानाच्या मालकावर गोळीबार करून जखमी केले, त्यापूर्वी त्याने ऑटोरिक्षात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

दरम्यान, दुकान मालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनिल ढमाले असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. आकाश गजानन जाधव असे जखमी दुकान मालकाचे नाव आहे.

दरम्यान, तीन महिन्यापासून ढमाले याला जाधव हे आर्थिक कारणावरुन त्रास देत होते. आता  मला पर्याय नाही, म्हणून मी हा निर्णय घेत असल्याचे ढमाले यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आढळले आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.