पाय हलवू नको म्हणत पती ओरडला, पत्नीला आला राग, नवऱ्याचे हात-पाय बांधले अन् केलं भयंकर कृत्य…

पुण्यातील चक्रपाणी वसाहत भोसरी येथे एक धक्कादायक घडली आहे. यामध्ये पती-पत्नीच्या गप्पा सुरू असताना पत्नी वारंवार पाय हलवत होती. त्यामुळे पतीने पाय हलवू नको, असे सांगितले. यामुळे हा वाद वाढत गेला आणि याचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले.

मी तुमचे पाय बांधते, तुम्हाला बसता येईल का,’ असे म्हणून पत्नीने पतीचे पाय बांधले. त्यानंतर हात बांधून तोंडावर चिकटपट्टी लावली. तसेच टोळ्याला पट्टी बांधून नंतर सपासप वार करण्यास सुरुवात केली. यामुळे मोठी खळबळ उडाली.

यानंतर पत्नीला अटक करण्यात आली आहे. फिर्यादी विजयसिंह आणि त्यांची पत्नी घरात गप्पा मारत बसले होते. पत्नी सतत पाय हलवत होती. म्हणून विजयसिंह यांनी पत्नीला, पाय हलवू नको, असे सांगितले. यामुळे पत्नी चिडली.

पत्नीने विजयसिंह यांना ‘मी तुमचे पाय बांधते, तुम्ही तसेच बसून दाखवा,’ असे म्हटले. पत्नीने त्यांचे हात, पाय दोरीने बांधले. तोंडावर चिकट टेप लावली. आणि डोळ्यांना पट्टी बांधली. यानंतर मात्र पत्नीने अंगावर बसून हातावर आणि गळ्यावर वार केले.

यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भोसरी पोलीस तपास करीत आहेत. आरोपी महिला आणि फिर्यादी यांचा सात महिन्यांपूर्वीच विवाह झाला आहे. ते कामासाठी पुण्यात राहतात.

त्यांचे गाव सांगली असून दोन महिन्यापूर्वी ते सांगली येथील गावाहून भोसरी येथे कामानिमित्त आले होते. फिर्यादी हे एका लॅबमध्ये काम करतात. तसेच आरोपी पत्नी गृहिणी आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.