माणुसकी दाखवने पडले महागात! कंडक्टरने संपवले जीवन; पत्नीचा काळीज चिरणारा टाहो

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी मोहित यादव ३ जूनला दिल्लीला जाणाऱ्या बसमध्ये वाहक होता. बसमधील दोन प्रवाशांना नमाज अदा करण्यासाठी त्याने बरेली-दिल्ली महामार्गावर थांबवली. त्यामुळे चालकाला निलंबित करण्यात आले होते.

नंतर चालकाने टोकाचे पाऊल उचलले. यामुळे एकच खळबळ उडाली. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी मैनपुरीतील त्याच्या घराजवळ असलेल्या रेल्वे रुळांवर सापडला. यामुळे हे प्रकरण सगळीकडे समजले.

घटनेनंतर मोहित आणि बस चालकाविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. मोहित उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यातील घिरौर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खुशालीचा रहिवासी होता. या घटनेनंतर त्याला मोठा धक्का बसला होता.

तो आठ वर्षांपासून राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये कर्मचारी होता. निलंबित करण्यात आल्यानंतर पगार बंद झाल्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. जवळचे पैसे संपल्याने त्याने हा निर्णय घेतला.

मोहितने आत्महत्या करण्याआधी त्याच्या मित्राला फोन केला होता. त्याच्या मित्राने याबाबत माहिती दिली. तो म्हणाला, आम्ही सोबत काम करायचो. त्याच्याकडे फोन रिचार्ज करण्यासाठी देखील पैसे नव्हते. नोकरी पुन्हा मिळेल याची आशा त्याला वाटत नव्हती, असे मोहितचा मित्र म्हणाला.

दरम्यान, मोहित यांना १७ हजार रुपये पगार मिळायचा. पण निलंबनानंतर उत्पन्नाचे काहीच साधन नव्हते. संपूर्ण कुटुंब मोहितच्या उत्पन्नावर अवलंबून होते, असेही त्याने सांगितले. नोकरी गेल्यानंतर पती तणावाखाली होते, अशी माहिती मोहितची पत्नी रिंकीने दिली.