नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, अंगावर नऊवारी; प्रार्थना बेहरेच्या लुकमुळे श्रेयस तळपदे घायाळ, म्हणाला मॅडम तुम्ही तर…

काही अभिनेत्री या सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. त्यामध्ये फक्त बॉलिवूडच्याच नाही, तर मराठी अभिनेत्रींचीही नावे येतात. प्रार्थना बेहेरे त्यातलच एक नाव. अभिनयासोबतच तिने तिच्या सौंदर्यानेमुळे आपला एक चाहता वर्ग निर्माण केला आहे.

प्रार्थना आधी मालिकांमध्ये काम करत होती. पण त्यानंतर तिच्या अभिनयाच्या जोरावर तिला चित्रपटसृष्टीतही काम मिळू लागले. कॉफी आणि बरंच काही या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर मितवा, मिस्टर अँड मिसेस सदाचारी अशा अनेक मराठी चित्रपटात ती झळकली.

चित्रपटांमध्ये काम सुरु असताना तिने एक मालिकाही केली होती. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत तिने श्रेयस तळपदेसोबत काम केले होते. त्यामध्ये तिने आईची भूमिका साकारली होती. तिची ती भूमिकाही खुप गाजली होती. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येमध्ये भर पडली होती.

प्रार्थना सोशल मीडियाव खुप सक्रीय असते. ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच आपल्या कामाची माहितीही ती देत असते. आता तिने एक फोटोशुट केले आहे, जे खुप चर्चेचा विषय ठरले आहे. या फोटोंमध्ये ती मराठमोळ्या लुकमध्ये दिसून येत आहे.

प्रार्थनाने नववारी साडी, कपाळावर चंद्रकोर, गळ्यात आणि हातात दागिने घालून खास फोटोशुट केले आहे. त्या फोटोशूटचे फोटो सध्या खुप व्हायरल होत आहे. बाई गं कसं करमत न्हाई गं असे कॅप्शन तिने फोटोच्या पोस्टला दिले आहे.

सोशल मीडियावर हा फोटो खुप व्हायरल झाला असून त्या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहे. श्रेयस तळपदेने सुद्धा फोटोवर कमेंट करुन तिच्या या लुकचे कौतूक केले आहे. मॅडम बोलती बंद मॅडम अशी कमेंट श्रेयसने त्या फोटोवर केली आहे. त्याचीही कमेंट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.