मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत येत असतात. त्यातलेच एक नाव म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर खुप सक्रीय असतो. वेगवेगळ्या पोस्ट करुन तो नेहमीच त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधत असतो.
सिद्धार्थ त्याची पत्नी मिताली मयेकरसोबतचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. त्यामुळेही तो चांगलाच चर्चेत येत असतो. पण आता मात्र तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
सिद्धार्थने आता त्याच्या आयुष्यातील खुप खास क्षण शेअर केला आहे. सिद्धार्थने त्याच्या आईचे दुसरे लग्न लावून दिले आहे. त्यामुळे सिद्धार्थ चांगलाच चर्चेत आला आहे. तसेच आईचं दुसरं लग्न लावून देण्यात त्याने साथ दिल्यामुळे सोशल मीडियावर त्याचे कौतूक केले जात आहे.
सीमा चांदेकर असे त्याच्या आईचे नाव आहे. त्याच्या आईने आता दुसरं लग्न केलं असून सिद्धार्थनेही तिच्या या निर्णयात तिला साथ दिली आहे. सिद्धार्थने त्याच्या आईचे जोडीदारासोबतचे काही फोटो शेअर केले आहे. तसेच एक खास पोस्टही लिहीली आहे.
हॅप्पी सेकंट इनिंग्स आई. तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्तही तुझं एक आयुष्य हवं. तुझंही एक स्वतंत्र असं एक जग हवं. हे माझ्या कधी लक्षातच आली नाही गं. किती ते एकटं एकटं राहायचं? तु आतापर्यंत सर्वांचा विचार केलास, पाय झिजवलेस. आता तु फक्त तुझा आणि तुझ्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठिशी आहे, अशी पोस्ट सिद्धार्थने लिहिली आहे.
तसेच पुढे तो म्हणाला की, आई तु माझं लग्न थाटात लावलं होतं. आता मी तुझं लग्न थाटामध्ये लावतोय. माझ्या आयुष्यातील आणखी सुंदर लग्न, माझ्या आईचं. लव्ह यु आई हॅप्पी मॅरीड लाईफ. सिद्धार्थची ही पोस्ट सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. त्याच्या या निर्णयामुळे त्याचे चाहतेही त्याचे कौतूक करताना दिसत आहे.