सहा महिन्यांपूर्वी गावातून पळून गेले अन् आता विवाहीत प्रेमयुगूलाने एकत्रच संपविले जीवन, घटनेने उडाली खळबळ

यवतमाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी दोन्ही तरुण तरुणीचे विवाहित असताना देखील विवाहबाह्य प्रेम संबंध होते. या प्रेमाखातर दोघे घरातून पळून गेले होते.

यानंतर गावी आल्यावर दुसऱ्याच दिवशी त्यांनी एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. यवतमाळमध्ये झरी तालुक्यात कोडपाखिंडीच्या जंगलात ही घटना उघडकीस आली आहे.

हे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते.  कोडपाखिंडी गावातील नामदेव खडसे हा विवाहित असून त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. तर मंदा अर्जुन गाऊत्रे ही देखील विवाहित असून या महिलेला दोन मुली आहेत. असे असले तरी मागील काही महिन्यापासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते.

यामुळे त्यांनी पळून जायचा निर्णय घेतला होता. मात्र तीन दिवसांपूर्वी दोघेही गावात परत आले. नंतर त्यांना घरच्यांनी घरात घेण्यास नकार दिला. यामुळे सायंकाळी दोघेही कोडपाखिंडी गावाजवळ असलेल्या जंगलात गेले.

तिथे मुरूमाच्या खाणीत असलेल्या झाडाला एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली. मंदा अर्जुन गाऊत्रे (वय ३०) आणि नामदेव गोंविदा खडसे असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमयुगलाचे नाव आहे.