झोपलेल्या शिक्षिकेला मारहाण अन् विजेची तार हातात घेऊन दिला करंट; मुंबईतील भयंकर घटना

मुंबईमधील अंधेरी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी एका शिक्षिकेला तिच्याच स्वयंपाक्याने विजेच्या तारेने करंट दिला. या शिक्षिकेने त्याला रागावलं होतं. त्यामुळे तो खूप चिडला होता. यामुळे ही घटना घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, महिलेच्या घरी गेल्या २ वर्षांपासून स्वयंपाकी म्हणून तो काम करत होता. आरोपीकडे घराची दुसरी चावी होती, यामुळे तो फ्लॅटवर पोहोचला. यावेळी
शिक्षिका घरात झोपलेली होती. यावेळी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.

आरोपीने तिच्या हातात विद्युत तार दिली. तसेच तिचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. महिलेचा ११ वर्षांचा मुलगा दुसऱ्या खोलीत झोपला होता, आरडाओरडा झाल्यावर तो धावत आला. नंतर महिलेने माफी मागितल्यावर तो थांबला. या झटापटीत महिला जखमी देखील झाली आहे.

दरम्यान, आपल्या मुलावरही हल्ला करेल या भीतीने महिलेने मुलाला खोलीत लपण्यास सांगितले. या घटनेनंतर आरोपी फरार आहे. अंबोली पोलिसांनी राजकुमार सिंगविरोधात एफआयआर नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. एक पथक देखील नेमण्यात आले आहे.

याबाबत महिला त्याला म्हणाली, मी हे काय केले, मी हे करायला नको होते. मग महिलेची माफी स्वीकारून तो तेथून निघून गेला. यामुळे महिला खुपच घाबरली होती. आता कस वाटतंय म्हणत तो तेथून निघून गेला.