केंद्रीय मंत्री स्मृती इराणी त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. त्यांच्यावर कोणी टीका केली तर ते बेधडकपणे उत्तरे देताना दिसून येतात. अशात स्मृती इराणी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम फॉलोवर्सशी संवाद साधला होता.
स्मृती इराणी यांनी आस्क मी क्वेश्चनचे एक सेशन घेतले होते. त्यावेळी त्यांनी चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहे. या सेशनमध्ये एका चाहत्याने त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यामुळे त्या प्रचंड भडकल्या असून त्यांनी त्या चाहत्याला चांगलेच सुनावले आहे.
स्मृती इराणी यांनी झुबिन इराणी यांच्याशी लग्न केलं होतं. झुबिन इराणी यांचे हे दुसरं लग्न होतं. त्यांचं पहिलं लग्न हे मोना यांच्याशी झालं होतं. त्याचाच संदर्भ घेत चाहत्याने एक प्रश्न स्मृती इराणी यांना या सेशनमध्ये विचारला होता.
तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या पतीशी लग्न केलंय का? असा प्रश्न चाहत्याने विचारला होता. त्यानंतर स्मृती इराणी यांनी त्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. कारण त्यांना अनेकदा या प्रश्नाचा सामना करावा लागला आहे. तसेच त्यांच्यावर या विषयावरुन मोठ्या प्रमाणात टीकाही झाली आहे.
मोना या माझ्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या आहेत. त्यामुळे त्या माझ्या लहानपणीच्या मैत्रिण असण्याचा काहीच संबंध नाही. मोना माझ्या कुटुंबाचा भाग आहे, ती राजकारणी नाहीये. त्यामुळे तिला यात ओढू नका, असे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.
तसेच माझ्याशी भांडा, वाद घाला, बदनाम करा, पण राजकारणाशी संबंध नसलेल्या नागरिकाला उगाच तुमच्यासह गटारात ओढू नका. ती आदरणीय व्यक्ती आहे, असेही स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.