शर्टाच्या आतून अचानक येऊ लागला विचित्र आवाज, शर्टच्या आत बघताच अंगावर आला काटा

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल असतात. काही व्हिडिओ हे विनोदी असतात, तर काही व्हिडिओ हे थरकाप उडवणारे असतात. आता असाच अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

साप हे अनेकदा बिळात राहतात. पण पावसाळ्यामुळे ते किचन, टॉयलेटमध्येही आढळून येताना दिसत आहे. तुम्हीही अशा अनेक घटनांबद्दल ऐकले असेल. पण आता एक साप चक्क एका माणसाच्या शर्टामध्ये आढळून आला आहे.

एक व्यक्ती झाडाखाली बसलेला असतो. त्यावेळी त्याच्या शर्टाच्या आतून काही आवाज येत असतात. सुरुवातीला तो व्यक्ती शर्टाच्या बटणांकडे पाहतो. तेव्हा त्याला धक्काच बसतो. कारण शर्टामध्ये एका सापाचे डोके दिसते.

त्यावेळी तिथे काही लोकंही असतात. तो साप त्या लोकांना पाहतो आणि पुन्हा त्या शर्टच्या आत जाऊन बसतो. त्यावेळी एक दुसरी व्यक्ती त्याच्या शर्टाची बटणे उघडते. ते पाहता तर साप त्या माणसाच्या पोटाला गुंडाळून बसलेला असतो.

https://twitter.com/HasnaZarooriHai/status/1684149022318301185?s=20

त्यानंतर ते सापाची शेपूट पकडून हळुहळु त्याला तिथून काढताना दिसतात. जेव्हा सापाला त्या माणसापासून वेगळं करतात, तेव्हा तो साप खुपच भयानक दिसतो. तो साप अगदी काळाकुट्ट आणि लांबलचक असतो. तो साप त्या व्यक्तीच्या शर्टामध्ये कधी घुसला हे त्या व्यक्तीला कळालेही नव्हते.

तो झाडाखाली आराम करत असताना साप त्याच्या शर्टाच्या आत घुसल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर या सापाचा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकजण वेगवेगळ्या कमेंट करत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी थरकाप उडाल्याचेही म्हटले आहे. तर एकाने तो माणूस स्टंट करत आहे, असे म्हटले आहे.