दोन दिवसांपासून गाडीतून येत होता विचित्र आवाज; बोनेट उघडल्यावर सगळेच हादरले

अनेकदा काही विचित्र गोष्टी समोर येत असतात. अशीच एक विचित्र घटना आता लंडनमधून समोर आली आहे. एका जोडप्याच्या गाडीमधून आवाज येत होता. त्यांना वाटले इंजिन खराब झाले असेल, पण त्यानंतर त्यांनी जे पाहिलं ते हादरवून टाकणारं होतं.

एका जोडप्याच्या गाडीतून काही दिवसांपासून विचित्र आवाज येत होता. त्यांना वाटले की इंजिन खराब असेल. त्यामुळे त्यांनी नक्की काय झाले हे पाहण्यासाठी गाडी बघितली तर त्यांना त्यांच्या गाडीमध्ये एक भलामोठा साप दिसून आला.

या सापाचे फोटो सुद्धा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित घटना ही इंग्लंडच्या ग्लुसेस्टरशायरची आहे. सायरा अहमद असे त्या महिलेचे नाव आहे, जिच्या गाडीमध्ये साप निघाला आहे.

महिलेने सांगितले की कारच्या इंजिनमधून खुप आवाज येत होता. मला वाटले की कारचे इंजिन खराब झाले असावे. माझ्या पतीलाही वाटले की कारचे इंजिन खराब झाले असावे म्हणून असा आवाज येत असेल. पण जेव्हा आम्ही गाडी तपासली तेव्हा वेगळंच काही समोर आलं होतं.

या कारमध्ये त्यांना कॉर्न स्नेक दिसला. हा विषारी साप नाहीये. पण तरीही गाडीमध्ये चक्क साप आढळल्याने त्यांना सर्वांनाच धक्का बसला. त्या सापाने आधी बोनेटमधून डोके बाहेर काढले त्यानंतर तो पुन्हा गाडीच्या आत जाऊन लपून बसला होता.

त्यानंतर सायरा आणि तिच्या पतीने एका सर्पमित्राला बोलावून आणले. त्या सर्पमित्राने त्याच्यासोबत त्याची टीमही आणली होती. त्यानंतर त्या सापाला कारमधून बाहेर काढण्यात आले. हे साप बिनविषारी असतात, ते कधीच स्वत:हून चावत नाही, असे या सर्पमित्राने म्हटले आहे.